Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:17

[1] परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.

[2] सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.

[3] ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.

[4] राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.

[5] परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.

[6] त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

[7] तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.

[8] हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.

[9] परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.

स्तोत्रसंहिता — Chapters