Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:50

[1] मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?

[2] परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.

[3] तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.

[4] पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.

[5] परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.

[6] दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.

[7] परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.

[8] परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.

स्तोत्रसंहिता — Chapters