Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:03

[1] माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”

[2] परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.

[3] तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.

[4] परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”

[5] प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.

[6] तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.

[7] तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.

स्तोत्रसंहिता — Chapters