Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:46

[1] जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,

[2] तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.

[3] समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.

[4] पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.

[5] हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?

[6] पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?

[7] हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.

[8] तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

स्तोत्रसंहिता — Chapters