Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:45

[1] जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.

[2] यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.

[3] नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.

[4] हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.

[5] पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो.

स्तोत्रसंहिता — Chapters