Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:44

[1] हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.

[2] परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.

[3] परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.

[4] त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.

[5] कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.

स्तोत्रसंहिता — Chapters