Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:49

[1] परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.

[2] त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.

[3] शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.

[4] डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.

[5] जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.

[6] प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता — Chapters