Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:02

[1] परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.

[2] “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला

[3] परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.

[4] मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला

[5] मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.

[6] जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.

[7] हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.

[8] तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.

स्तोत्रसंहिता — Chapters