Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:35

[1] आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.

[2] सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.

[3] देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.

[4] कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.

[5] त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.

[6] भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.

[7] पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.

[8] होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.

[9] देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.

[10] देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.

[11] तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.

[12] सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.

[13] उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.

[14] कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.

स्तोत्रसंहिता — Chapters