Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:49

[1] हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.

[2] हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.

[3] हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?

[4] पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.

[5] मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.

[6] पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

[7] हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.

[8] तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.

स्तोत्रसंहिता — Chapters