Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:05

[1] परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.

[2] देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.

[3] तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.

[4] तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.

[5] तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.

[6] परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.

[7] काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.

[8] ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!

[9] हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.

स्तोत्रसंहिता — Chapters