Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:59

[1] आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.

[2] हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.

[3] हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.

[4] इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.

[5] कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

[6] यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.

[7] तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.

[8] माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.

[9] परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

स्तोत्रसंहिता — Chapters