Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:12

[1] हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.

[2] नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.

[3] जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.

[4] मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.

[5] विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.

[6] विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.

[7] पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.

[8] कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.

[9] पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.

[10] तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे उंच करीन.

स्तोत्रसंहिता — Chapters