[1] अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,
[2] “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे.
[3] मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
[4] खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे.
[5] देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
[6] तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो.
[7] जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.
[8] जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले
[9] आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
[10] तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो.
[11] जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील.
[12] परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
[13] जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
[14] ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल.
[15] परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो.
[16] खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते.
[17] परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात.
[18] तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो.
[19] आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय?
[20] दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात.
[21] काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा.
[22] पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. त्याच्या समान कोण शिक्षक आहे?
[23] त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही.
[24] त्याने जे काही केले त्याबद्दल लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
[25] त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात.
[26] होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे.
[27] तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो.
[28] अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
[29] खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो?
[30] बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो.
[31] तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
[32] तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
[33] मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”