[1] नंतर नामाथीच्या सोफरने उत्तर दिले आणि तो म्हणाला,
[2] “शब्दांच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे? सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का?
[3] तुझा गर्वाच्या बडबडीने दुसरे चूप होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजीत करणार नाही काय?
[4] तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे, आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे.
[5] अहो, परंतु, देवाने बोलावे आणि तुझ्या विरूद्ध त्याने ओठ उघडावे.
[6] तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे.
[7] तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
[8] त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?
[9] तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.
[10] फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले, जर त्याने एखाद्याचा न्याय करावयाचे ठरवले तर त्यास कोण अडवू शकेल?
[11] त्यास चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय?
[12] परंतु मूर्ख मनुष्यास शाहाणपण समजत नाही, त्यांना समजेल रानटी गाढव मनुष्यास जन्म देईल.
[13] परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.
[14] तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
[15] तरच तू निश्चित त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील.
[16] तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
[17] भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल.
[18] तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील.
[19] तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील.
[20] वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”