Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:45

[1] नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,

[2] “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.

[3] त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?

[4] मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.

[5] पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.

[6] मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”

ईयोब — Chapters