Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:58

[1] “मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.

[2] तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.

[3] अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?

[4] अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.

[5] मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही.

[6] तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.

[7] वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात.

[8] त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.

[9] तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.

[10] परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो.

[11] जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते.

[12] मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही.

[13] तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल.

[14] मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.

[15] तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.

[16] पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.

[17] तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.

[18] डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.

[19] खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते.

[20] तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु:खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो

[21] त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत.

[22] फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत:साठी रडते.”

ईयोब — Chapters