Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:46

[1] बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

[2] चौथा नोहा व पाचवा राफा.

[3] आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,

[4] अबीशूवा, नामान, अहोह,

[5] गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.

[6] एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.

[7] नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.

[8] शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.

[9] त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,

[10] यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.

[11] हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.

[12] एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.

[13] बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

[14] हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ,

[15] जबद्या. अराद, एदर,

[16] मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.

[17] जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,

[18] इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.

[19] याकीम, जिख्री, जब्दी,

[20] एलीएनय, सिलथय, अलीएल,

[21] अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र

[22] इश्पान, एबर, अलीएल,

[23] अब्दोन, जिख्री, हानान,

[24] हनन्या, एलाम, अनथोथीया,

[25] इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.

[26] शम्शरय, शहऱ्या, अथल्या,

[27] यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.

[28] हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.

[29] गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.

[30] त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,

[31] गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.

[32] शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.

[33] कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.

[34] योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.

[35] पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.

[36] यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.

[37] बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.

[38] आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.

[39] आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.

[40] ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.

1 इतिहास — Chapters