[1] इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
[2] उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
[3] इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
[4] त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
[5] इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
[6] बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
[7] बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
[8] जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
[9] आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
[10] यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
[11] यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
[12] शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
[13] यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
[14] मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
[15] हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
[16] माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
[17] ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
[18] माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
[19] अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
[20] एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. शुथेलहचा पुत्र बेरेद. बेरेदाचा पुत्र तहथ. तहथाचा पुत्र एलादा. एलादाचा पुत्र तहथ.
[21] तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
[22] एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
[23] मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
[24] त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
[25] रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन.
[26] तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
[27] त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
[28] एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
[29] मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
[30] इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
[31] हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
[32] यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
[33] पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
[34] अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
[35] शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
[36] सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
[37] बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
[38] यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
[39] आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
[40] हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.