Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:06

[1] दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:

[2] आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.

[3] यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.

[4] हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.

[5] हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.

[6] हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.

[7] ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.

[8] त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.

[9] तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.

[10] तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.

[11] चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.

[12] पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.

[13] सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

[14] सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

[15] यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.

[16] नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.

[17] दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[18] अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.

[19] बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.

[20] तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[21] चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.

[22] पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.

[23] सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

[24] सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[25] अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[26] एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.

[27] विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.

[28] एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[29] बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

[30] तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

[31] चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.

1 इतिहास — Chapters