Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 6:34

[1] आदाम, शेथ, अनोश,

[2] केनान, महललेल, यारेद,

[3] हनोख, मथुशलह, लामेख,

[4] नोहा, शेम, हाम आणि याफेथ.

[5] याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास

[6] गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा

[7] यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, दोदानीम.

[8] हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.

[9] कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.

[10] कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.

[11] मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम

[12] पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.

[13] आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,

[14] यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

[15] हिव्वी, आर्की, शीनी

[16] अर्वादी, समारी, हमाथी हे होत.

[17] एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.

[18] शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.

[19] एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.

[20] यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

[21] हदोराम, ऊजाल, दिक्ला,

[22] एबाल, अबीमाएल, शबा,

[23] ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.

[24] शेम, अर्पक्षद, शेलह,

[25] एबर, पेलेग, रऊ

[26] सरुग, नाहोर, तेरह,

[27] अब्राम म्हणजेच अब्राहाम.

[28] इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.

[29] ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,

[30] मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा

[31] यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.

[32] अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.

[33] एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.

[34] इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.

[35] एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.

[36] अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.

[37] नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.

[38] लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.

[39] होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.

[40] आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.

[41] दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.

[42] बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.

[43] इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.

[44] बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.

[45] योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.

[46] हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.

[47] हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.

[48] साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.

[49] शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.

[50] बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.

[51] पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,

[52] अहलीबामा, एला, पीनोन,

[53] कनाज, तेमान मिब्सार,

[54] माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.

1 इतिहास — Chapters