[1] ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
[2] दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
[3] एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
[4] यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.
[5] हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते.
[6] जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा.
[7] जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
[8] एथानाचा पुत्र अजऱ्या होता.
[9] यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.
[10] अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
[11] नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र.
[12] बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.
[13] इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,
[14] चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
[15] सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला.
[16] सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.
[17] अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.
[18] हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र.
[19] अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर.
[20] हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल.
[21] नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला.
[22] सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
[23] पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.
[24] हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.
[25] यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.
[26] यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.
[27] यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.
[28] शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.
[29] अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले.
[30] सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.
[31] अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
[32] शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.
[33] पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.
[34] शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
[35] शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
[36] अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला.
[37] जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला.
[38] ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.
[39] अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.
[40] एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला.
[41] शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.
[42] यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.
[43] कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र.
[44] शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.
[45] शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.
[46] कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.
[47] रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र.
[48] माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.
[49] तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.
[50] ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,
[51] बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ.
[52] किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,
[53] आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
[54] सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक.
[55] शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते.