Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:22

[1] आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.

[2] त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.

[3] आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;

[4] शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.

[5] अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.

[6] शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला

[7] अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[8] शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.

[9] अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;

[10] केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[11] अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.

[12] केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;

[13] महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[14] केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.

[15] महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;

[16] यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[17] महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.

[18] यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;

[19] हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[20] यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.

[21] हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;

[22] मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

[23] हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;

[24] हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.

[25] मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.

[26] लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.

[27] मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.

[28] लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.

[29] लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.

[30] नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.

[31] लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.

[32] नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.

उत्पत्ति — Chapters