Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:08

[1] बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.

[2] जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.

[3] परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.

[4] शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.

[5] आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.

[6] येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.

[7] एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.

[8] जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस.

[9] जक्काईचे वंशज सातशे साठ.

[10] बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.

[11] बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.

[12] अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.

[13] अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.

[14] बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.

[15] आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.

[16] हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.

[17] बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.

[18] योराचे वंशज एकशे बारा.

[19] हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.

[20] गिबाराचे वंशज पंचाण्णव.

[21] बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.

[22] नटोफातील लोक छपन्न.

[23] अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.

[24] अजमावेथातील लोक बेचाळीस

[25] किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.

[26] रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस.

[27] मिखमासातील लोक एकशे बावीस.

[28] बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.

[29] नबोतील लोक बावन्न.

[30] मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.

[31] दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.

[32] हारीम येथील लोक तीनशे वीस.

[33] लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.

[34] यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.

[35] सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.

[36] याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.

[37] इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.

[38] पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.

[39] हारीमाचे वंशज एक हजार सतरा.

[40] लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.

[41] मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.

[42] मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.

[43] मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.

[44] केरोस, सीहा, पादोन.

[45] लबाना, हगबा, अकूबा,

[46] हागाब, शम्लाई, हानान.

[47] गिद्देल, गहर, राया,

[48] रसीन, नकोदा, गज्जाम,

[49] उज्जा, पासेह, बेसाई,

[50] अस्ना, मऊनीम, नफसीम.

[51] बकबुक हकूफ, हरहुर,

[52] बस्लूथ, महीद, हर्षा,

[53] बार्कोस, सीसरा, तामह,

[54] नसीहा, हतीफा.

[55] शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,

[56] जाला, दार्कोन, गिद्देल,

[57] शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी

[58] मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.

[59] तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.

[60] दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.

[61] आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)

[62] आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.

[63] याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.

[64] सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.

[65] त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.

[66] त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.

[67] त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.

[68] हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.

[69] या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.

[70] याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.

एज्रा — Chapters