Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड
04 September 2026

RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड

"राज"कारण " Rajkaran

About
१९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सल्ल्याने अंतुलेंचा लातूरमध्ये भव्य सत्कार आयोजित केला. याच कार्यक्रमात विलासरावांनी अंतुलेंकडे एक मागणी केली—लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्या. अंतुलेंनी व्यासपीठावरून क्षणार्धात ही मागणी मान्य केली. प्रशासकीय अडचणींवर मात करत १९८२ मध्ये लातूर स्वतंत्र जिल्हा झाला. तब्बल २५ वर्षांनी, २००७ मध्ये मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांनी लातूरच्या रौप्य महोत्सवासाठी अंतुलेंना विशेष निमंत्रित करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. नाराजीपासून सुरू झालेली ही कथा पुढे राजकीय कृतज्ञतेच्या भावनिक नात्यात बदलली.



KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, A R Antulay, Vilasrao Deshmukh, Latur District, Latur District Formation, Maharashtra Politics, Maharashtra Political History, Latur History, Abdul Rahman Antulay, Vilasrao Deshmukh Biography, Maharashtra Chief Ministers