Skip to content
Opens in a new window
# 2127 : मृतदेहांची टंचाई अन् सोळा निर्घृण हत्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
08 September 2026

# 2127 : मृतदेहांची टंचाई अन् सोळा निर्घृण हत्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा (Anatomy) अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. शरीरातील हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, नसा, अवयव आणि त्यांची रचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे शवविच्छेदन हा वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र काही शतकांपूर्वी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसमोर एक मोठीच समस्या होती. मानवी शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करायचा, पण त्यासाठी मृतदेहच मिळत नव्हते.