About
Send us Fan Mail
कृष्णाच्या जन्माच्या रात्री मथुरेत मुसळधार पाऊस कोसळत होता.
तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन यमुनेकडे निघाले.
दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णाच्या चरणांशी येऊन शांत झाली आणि शेषनागाने फण्यांचं छत्र धरून त्याचं रक्षण केलं.
वसुदेवांनी कृष्णाला गोकुळात पोहोचवलं आणि परत तुरुंगात आले.
कंसाला मात्र कृष्ण मथुरेतच असल्याचं वाटत होतं. पण ज्याला तो शोधत होता, तोपर्यंत कृष्ण गोकुळात सुरक्षित पोहोचला होता!
===========