Skip to content
Opens in a new window
# 2105 : हिटलरचा मृत्यू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
18 August 2026

# 2105 : हिटलरचा मृत्यू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या ५० फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता. 

फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडलेले असायचे. 

२५ एप्रिल १९४५ नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, स्वतःच्या मरणाची तयारी करणं.