Opens in a new window
# 2085 : काय करायचं या रील्सचं? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
19 July 2026

# 2085 : काय करायचं या रील्सचं? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

काही वर्षांपूर्वी वेटिंगमध्ये बसलेले लोक वर्तमानपत्र वाचायचे-काही मासिकं चाळायचे-काही एकमेकांशी बोलायचे-कुणी दुसऱ्या पेशंटशी ओळख काढायचा-डॉक्टर कसे आहेत याची चौकशी करायचा-एखादं मूल भिंतीवरच्या शरीररचनेच्या चार्टकडं बघून प्रश्न विचारायचं.
आणि आता? 
दहा माणसं बसलेली असतात पण तिथं एकही माणूस नसतो; सगळे कुठेतरी दुसरीकडे गेलेले असतात..
कुणी दुबईतल्या फूड ब्लॉगरसोबत-कुणी अमेरिकेतल्या प्रँक व्हिडिओमध्ये-कुणी कोरियन स्किनकेअरमध्ये-कुणी क्रिकेटच्या रीलमध्ये-कुणी राजकारणात तर कुणी कट-कारस्थानात आणि बाकी सगळे त्या "टे टे टे..."च्या तालावर मेंदूचा ताबा गमावत असतात..!"