# 2046 : श्रीरामांचा वनवासातील प्रवास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
25 May 2026

# 2046 : श्रीरामांचा वनवासातील प्रवास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. माता कैकयीच्या हट्टापाई श्री राम, लक्ष्मणजी आणि सीता मातेला वनवासाला जावं लागलं. विष्णूंचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला तरी त्यांनी वनवासात श्रीलंकेपर्यंत केलेल्या भ्रमंतीमूळे अवघी भारतभूमीच त्यांच्या सहवासाने पावन झाली आहे. श्रीरामांनी बरोबर चौदा वर्षे वनवास भोगला. चौदा वर्षांच्या वनवासात श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांनी नेमके कुठे कुठे वास्तव्य केले, जाणून घेऊया.