
About
Send us Fan Mail
अठराव्या शतकाचा शेवटचा काळ. दादा गद्रे हे पेशवाईचे मोठे सावकार आणि सरदार होते. दृष्टांतानुसार त्यांनी मुरलीधराचं भव्य मंदिर उभारायचंच ठरवलं .
मूर्तीच्या सौंदर्याच्या चर्चा थेट दुसरे बाजीराव पेशव्यांपर्यंत जाऊन पोहोचल्या. पेशव्यांनी ती शनिवारवाड्यात आणण्याची इच्छा व्यक्त केली. पण गद्रे सावकारांनी नम्रपणे नकार दिला.
रातोरात मूर्ती गुपचूप त्यांच्या सदाशिव पेठेतील बागेत हलवण्यात आली.
एका बाजूला अरब रक्षक. दुसऱ्या बाजूला कवायती सैनिक. त्या दिवशी मंदिराच्या दाराशी मोठा रक्तपात झाला...