
About
Send us Fan Mail
अस्वस्थ राजा प्रधानाला म्हणाला, “एक य:कश्चित न्हावी माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे, हे मला सहन होत नाही. काहीतरी करा.”
प्रधानाने त्याच्या आयुष्यात नव्याण्णव रुपये टाकले.
मग त्याच्या आयुष्याची परवड सुरू झाली.
“आधी न्हावी 'आहे त्यात आनंदी होता.' पण आता त्याला शंभर पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर दोनशे, मग पाचशे, मग हजार. आता त्याच्या मनाच्या भुकेला शेवट उरला नाही.”
“आता त्याच्याही नशिबात तुमच्या सारखा राजयोग आला आहे. आता तोही कधी शांत राहणार नाही.”
हे ऐकून राजा प्रसन्न झाला...
...मात्र, प्रधान जाईपर्यंतच.... कारण आपल्यापेक्षा प्रधान अधिक प्रसन्न आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं!