# 2018 : अनावश्यक ॲंटिबायोटिक्स नको. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
20 April 2026

# 2018 : अनावश्यक ॲंटिबायोटिक्स नको. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

"डॉक्टर, तो साध्या 'पॅरासिटॅमॉल'ने बरा होणार नाही हो... तुम्ही त्याला ते 'स्ट्राँग एंटीबायोटिकच द्या. उद्या मुलाची ट्रीप आहे, आम्हाला रिस्क नकोय!"
त्या सुशिक्षित बापाचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड झाला.
त्यांना 'रिस्क' नको होती.  कळस म्हणजे, त्या ५ वर्षांच्या मुलाला फक्त व्हायरल सर्दी होती, आणि त्याचे वडील स्वतःच्या हाताने त्याच्या शरीरात एका 'भस्मासुरा'ला जन्म द्यायला निघाले होते.