
14 April 2026
# 2013 : जगातल्या पहिल्या मोबाईल फोनची गोष्ट" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
३ एप्रिल १९७३. ठिकाण :न्यूयॉर्क शहर. सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. सिक्स्थ ॲव्हेन्यूवर त्या एका माणसाकडे लोकं वळून वळून बघतायत.
कारण त्याच्या हातात जी वस्तू आहे, ती दिसायला अगदी एखाद्या विटेसारखी आहे. लांबलचक, जाडजूड, वर एक मोठा अँटेना...
आणि त्या विटेसारख्या वस्तूतून हा माणूस, चक्क बोलतोय! रस्त्याच्या मधोमध उभं राहून, फोनवर बोलतोय!
ज्यादिवशी मार्टिन कूपरने तो फोन हातात घेतला, त्या दिवशी त्यांनी फक्त एक तांत्रिक चमत्कार केला नाही. त्यांनी माणसाला वायरच्या गुलामगिरीतून मुक्त केलं.