# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
17 March 2026

# 1993 : बोहोनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send a text

अनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो.
त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची.
त्यातल्या त्यात  वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे  संवाद सुरू होतो.
त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते.
बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. मग मी सरळ नकार देऊन दरवाजा लावू का विचारून दार बंद करते.