
About
Send a text
तेरावं झाल्यावर रोहित शंकरपाशी गेला आणि तोरा दाखवत म्हणाला,
"बघा शंकरराव, आता आई नाहीये. त्यामुळे तुमचं आणि माझं नातं संपलं. हे घर माझ्या सख्ख्या वडिलांचं आहे. मला हे घर विकायचं आहे. तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत रूम खाली करा."
शंकर शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुखः होतं, पण रोहितच्या वागण्याचं आश्चर्य नव्हतं.
ते फक्त एवढंच म्हणाले, "हो बाळा. मला माहित होतं हा दिवस येणार आहे. मी माझी बॅग भरली आहे. मी आजच निघतो."