
About
Send us a text
एकदा पुंडलिक नावाचा एक तरुण त्या वेळच्या पर्यटनाच्या साधनांनी काशीच्या यात्रेला निघाला होता, तो जंगलातून जातअसताना त्याचा रस्ता चुकला, तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला …तो आश्रम श्री कुकुटस्वामीचा होता. तिथे तो दोन रात्री राहिला कारण तो खूप थकलेला होता. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुट स्वामीना काशीला जाण्याचा सोपा व जवळचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही, हे अनपेक्षित ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही कसले ऋषी आहात??, स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला पण गेला नाहीत.'' कुक्कुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक तसाच पुढच्या प्रवासाला निघाला.