Episode 484 as on 24th February 2026
24 February 2026

Episode 484 as on 24th February 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th February 2026


प्रेमे युक्त अंतरात तूचि अससी मोकळा। मोकळेपणाने मज लाविसी त्या प्रेमकळा। प्रेमाची मोकळीक मजसी ती भावू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ प्रेमीभक्तांना आपला जास्तीत जास्त सहवास मिळावा यासाठी प्रभू प्रयत्नशील असत. गुरुवारचे निरूपण व इतर वारी नित्यनेमाने भेटी होत असतच पण कुठल्याही निमित्ताने किंवा निमित्त नसले तरीही प्रेमीभक्तांना त्यांच्या घरी भेटण्यास प्रभू नेहमीच उत्सुक असत. असा काही कार्यक्रम ठरला की प्रभू अन्य काही भक्तमंडळींना देखील सामावून घेत असत . एके दिवशी असेच प्रभू मुलुंडला त्यांचे प्रिय भक्त परमेश्वर वाघमारे यांच्याकडे येणार होते. त्यांनी तिथे मलाही बोलावून घेतले. काही प्रेमीभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम चालू झाला. सुरूवातीची स्तोत्र , पदगायन झाल्यावर अनपेक्षितपणे आणि अचानकपणे प्रभूंनी मला बोलावयास सांगितले . सहाजिकपणे माझ्या बोलण्यात मनोविजय ग्रंथाचा विषय आला. सद्गुरू व संतपुरुषांचे रामदासस्वामींनी केलेल्या वर्णनाच्या अनुषंगाने मी बोलत होतो.' दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जगी दासपाळू । तया अंतरी क्रोध संताप कैचा ।' मी श्लोक पूर्ण करण्याआधीच प्रभूंनी मला थांबवले. " संतसत्पुरुष व सद्गुरू दोघांचेही अंतःकरण कोमल असते व जीवाविषयी दोघांनाही कळवळा असतो. संतसत्पुरुष जीवाला सुखावतात व त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतात. ईश्वरावरती श्रध्दा ठेवायला सांगतात . पण सद्गुरूंचे तसे नसते. त्यांना शिष्याला घडवायचे असते. सद्गुरूंच्या अंतःकरणातही संतसत्पुरुषांप्रमाणे क्रोधाचा लवलेश नसतो पण वेळप्रसंगी शिष्याच्या हिताकरता ते क्रोधाचा आविर्भाव प्रकट करतात .तेज प्रकट करतात . सत्ता ईश्वराची आहे याची जाणीव असूनसुद्धा , माझ्यावर श्रध्दा ठेव असे आत्मविश्वासाने सांगतात . कारण त्यांना शिष्याला घडवायच असत. त्यांचे तेज असेच अधूनमधून प्रकट होत असल्यानेच शिष्याला त्यांचा आधार वाटतो व तो अधिक जोमाने त्यांच्याशी जवळीक साधायला लागतो. निदान माझा तरी तसा अनुभव आहे. देवा तुझ्या प्रेमाचा तो ... श्रीपरमानंदार्पणमस्तु