Episode 506 as on 12th May 2026
12 May 2026

Episode 506 as on 12th May 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th May 2026

सुप्रभात, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति . एक प्रभूंना नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार पोहचतो कारण सर्व देवांचे गुणधर्म प्रभूंमध्ये सामावलेले आहेत . त्यांच्याठायी शंकराचे वैराग्य, गणपतीची बुध्दी, बुधाचे चातुर्य, दत्तप्रभूंची आर्तता, देवीचे मांगल्य, हनुमंताची भक्ती व रवीचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् एक देव पूजन व भजनासाठी जीवन अवघे उरले. जय परमानंद 🙏🙏🙏

सुप्रभात, ईश्वराची भक्ती म्हणजे राग , सूर , स्वर , ताल व शब्द यांना गुंफून बंदिस्त नव्हे तर मुक्त केलेले स्थिर व मधुर आत्मगायन आहे. पांडुरंगाने असेच गायन करून संतसत्पुरुषांचा व परिणामी जनसामान्यांचा मेळा जमविला . दत्तप्रभूंच्या कार्यात प्रभूसुध्दा ही बंदिशी सुखानंदसंवाद व अन्य माध्यमातून अविरतपणे गात आहेत. त्यांची बंदिशी हीच माझी बंदिशी. तीच बंदिशी जमेल तशी गायचा माझा प्रयत्न आहे .वेडे वाकुडे गाईन । परी तुझाचि म्हणवीन। जय परमानंद 🙏🙏🙏