
About
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 28th April 2026
सुप्रभात, प्रदक्षिणा खूप झाल्या , संपवल्या आणि पांडुरंगाच्या गाभार्यात प्रवेश केला. तिथे कुणी नाही तिसरा. जर बाहेर पडायची वेळ आलीच तर विठोबाला घेऊनच बाहेर पडायच. माझा देव माझ्यापाशी. नित्य भेटतो मजसी. जय परमानंद 🙏🙏🙏
सुप्रभात, नामदेव कीर्तनात दंग आहे आणि पांडुरंग गाभाऱ्यात वाट बघत उभा आहे. भेटीसाठी आतुर आहे. आर्तता देवाच्या ठायीच आहे. म्हणून तर भक्ताच्या प्रतीक्षेत देव दत्तपीठात कटीवर हात ठेवून उभा आहे. भक्त कीर्तनात दंग आहे पण गाभाऱ्यात येत नाही म्हणून देवच गाभाऱ्याबाहेर येतो . जनाबाई म्हणते 'नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ' जय परमानंद 🙏🙏🙏