Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World
06 February 2026

Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World

Around The World

About
 'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! ७ फेब्रुवारीपासून ‘Men’s T20 Cricket World Cup’ सुरू होत आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज असतानाच, या वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला आमच्या स्टुडिओमध्ये एक ‘चॅम्पियन’ व्यक्तिमत्त्व उपस्थित आहे — ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले.

व्यावसायिक क्रिकेट पत्रकारितेमुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी मिळाली, पण या प्रवासात फक्त क्रिकेटच नाही, तर जागतिक खाद्यभ्रमंती आणि तिथल्या लोकजीवनाचाही मोठा वाटा आहे. स्वतःला मिश्किलपणे ‘इंटरनॅशनल बकासूर’ म्हणवून घेणारे सुनंदन सर या मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांच्या प्रवासातील अनेक पैलू उलगडतात. या संवादात ते पाकिस्तानमधील त्यांच्या भेटीबद्दल बोलताना मराठा साम्राज्याच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देतात.

अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठा वीरांचा इतिहास त्यांना तिथे कसा आठवला, हे ऐकण्यासारखं आहे. न्यूझीलंडमधील निसर्गसौंदर्य, ऑस्ट्रेलियातील भन्नाट किस्से, तसेच यूके आणि आयर्लंडमधील अनुभव ऐकताना तुम्हालाही त्यांच्यासोबत प्रवासाची सफर घडेल. याशिवाय, हर्षा भोगले यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबतच्या त्यांच्या मैत्रीचे पडद्यामागचे रंजक किस्सेही त्यांनी या भागात शेअर केले आहेत. प्रवासाकडे मिश्किल, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच अभिमानास्पद नजरेतून पाहणारा हा एपिसोड नक्की ऐका!

Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! With the Men’s T20 Cricket World Cup kicking off on February 7, India is all set to defend its championship. On the eve of this major tournament, we have a true champion guest in our studio—renowned senior cricket journalist Sunandan Lele. While cricket has taken him across the globe, it is his sharp wit and love for food—earning him the nickname “International Bakasur”—that make his travel stories truly unforgettable. Sunandan reflects on his visit to Pakistan, recalling the legacy of the Maratha Empire at Attock.

From calling New Zealand the most scenic destination to sharing hilarious anecdotes from Australia, the UK, and Ireland, he takes us on a captivating global journey. He also offers a peek into his long-standing friendships with icons like Harsha Bhogle, sharing fascinating behind-the-scenes travel stories. Watch the full episode for a unique perspective on travel through the eyes of a master storyteller.

Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
Production House: Evertale Studios